एक सहल अनुभवाची व आठवणींची
माझ्या काही अविस्मरणीय आठवणी व गमती मी तुम्हाला ह्या लेखामधून शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही जो आनंद घेतला, अनुभवला तो कसा होता तेही मी प्रस्तुत केले आहे. तर हा लेख पूर्ण वाचा. दि. १५ . ०८ . २०२० रोजी, स्वतंत्र दिवस असल्याने नेहमीप्रमाने सकाळी उठलो, झेंडावंदन साजरा केला आणि निघालो त्या डोंगर दऱ्यांकडे. औरंगाबाद पासून अंदाजे २० ते २५ किलोमीटर दूरवर असलेले खुलताबाद तालुक्यामधील एक छोटेसे खेड़ेगाव, नाव गोळेगाव. हे गाव माझ्यासाठी अनोळखी नव्हते कारण ते माझ्या मामाचे गाव. औरंगाबाद येथून मी आणि माझे मित्र निघालो त्या प्रवासासाठी, औरंगाबाद ते गोळेगाव प्रवास हा फक्त एक तासाचा पण जर तो प्रवास निसर्गाच्या व डोंगदऱ्यांच्या सानिध्यातला असेल तर प्रवास नक्की सुखकारक आणि मज्जेदार असतो. आम्ही मोटरसाइकल वर निघालो, पुढे हर्सुल गावापर्यंत आलो. हर्सुल पासून अवघे दोन किलोमीटर अंतरावर एक खूप मोठे तलाव आहे. मनाला मोहुन टाकणारे असे ते खूप मोठे तलाव आणि मागील अकरा ते बारा...