एक सहल अनुभवाची व आठवणींची
माझ्या काही अविस्मरणीय आठवणी व गमती
मी तुम्हाला ह्या लेखामधून शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही जो आनंद घेतला,
अनुभवला तो कसा होता तेही मी प्रस्तुत केले आहे. तर हा लेख पूर्ण वाचा.
दि. १५ . ०८ . २०२० रोजी, स्वतंत्र
दिवस असल्याने नेहमीप्रमाने सकाळी उठलो, झेंडावंदन साजरा केला आणि निघालो त्या डोंगर दऱ्यांकडे. औरंगाबाद पासून अंदाजे २० ते २५ किलोमीटर दूरवर असलेले खुलताबाद तालुक्यामधील
एक छोटेसे खेड़ेगाव, नाव गोळेगाव. हे गाव माझ्यासाठी अनोळखी नव्हते कारण ते माझ्या मामाचे
गाव. औरंगाबाद येथून मी आणि माझे मित्र निघालो त्या प्रवासासाठी, औरंगाबाद ते गोळेगाव
प्रवास हा फक्त एक तासाचा पण जर तो प्रवास निसर्गाच्या व डोंगदऱ्यांच्या सानिध्यातला
असेल तर प्रवास नक्की सुखकारक आणि मज्जेदार असतो. आम्ही मोटरसाइकल वर निघालो, पुढे
हर्सुल गावापर्यंत आलो. हर्सुल पासून अवघे दोन किलोमीटर अंतरावर एक खूप मोठे तलाव आहे.
मनाला मोहुन टाकणारे असे ते खूप मोठे तलाव आणि मागील अकरा ते बारा वर्षांपूर्वी हे
तलाव पूर्ण भरले होते त्यानंतर थेट ह्या वर्षीच्या जोरदार पावसामुले तो क्षण पुन्हा
बघायला मिळाला. त्या तलावाचे पानी ओसांडुन वाहत होते बघायला सुंदर आणि स्पर्शाला अतिशय
थंडगार असलेले ते पानी पुढे एक ओढ़याला मिळत होते. फोटो आणि विडियो घेण्याचा कार्यक्रम
चालू झाला आम्ही खूप सुंदर फोटो आणि विडियो काढले. एक तास कसा गेला ते समजलेच नाही,
फोटो काढण्याचा कार्यक्रम संपला आणि आम्ही तेथुन निघालो. अतिशय सुंदर असा तो रस्ता
दोन्ही बाजुने शेती, कुठे मक्का तर कुठे कपाशी पेरलेली, अशा हिरव्यागार वातावरनाने
माझे मन प्रफुल्लित करून टाकले होते. डोंगर दरयांचा परिसर असल्यामुळे आणि पाऊस चांगला
झालेला असल्या कारणाने सगळे ओढ़े हे खळखळ वाहत होते. तो पाण्याचा आवाज आणि ती थंडी थंडी
हवा दोघे मिळुन जसे काही मधुर गाणेच गाताय असे वाटत होते. डोंगरांमधून मोरांचा आवाज
येत होता. पुढे आम्हाला एक छोटासा ओढा दिसला मनात आल की चला थोड ह्या पाण्यासोबत पण खेळावं, आम्ही ओढ्यापाशी गेलो आणि तिथे खूप मज्जा केली, पाण्यासोबत खेळलो, फोटो आणि व्हिडिओ
काढले तेव्हड्यात मामाचा कॉल आला कुठपर्यंत आले विचारण्यासाठी, वेळ होत असल्यामुळे आम्ही तेथुन निघालो आणि थेट मामाचे घर येई पर्यंत कुठेच मध्ये थांबलों नाही. असे करत
आम्ही मामाच्या घरी पोहोचलों तेथे चहा नाष्टा केला आणि मामासोबत निघालो त्या अद्भुत
अशा रोमांचक आणि मज्जेदार , निसर्गाच्या कुशीकड़े, गावापासून ३ ते ४ किमी दूर असलेल्या
त्या डोंगरांकड़े. मामाने आमची दुपारच्या जेवनाची व्यवस्था करून ठेवली होती त्याने सगळे जेवण सोबत घेतले होते. आता सर्वात मज्जेदार गोष्ट अशी की आम्हाला त्या डोंगरांकड़े तर
मोटरसाइकलने च जायचे होते परंतु तिकडे जाण्यासाठी योग्य असा रस्ता नव्हता. एकच पर्याय
होता तो म्हणजे " पांधी " ने जायचा.
पांधी म्हणजे एक छोटासा मातीचा रस्ता ज्याच्या दोन्ही बाजुने शेती असते. दोन-तीन दिवस
चांगला पाऊस पडलेला असल्याने त्या पांधी मधे वाट कमी चीखल जास्त होता. कसेबसे करत आम्ही
त्या पांधी मधून आमच्या गाड्या चालवत होतो. पांधी च्या बाजुने एक छोटासा पाण्याचा ओढा
खळखळ वाहत होता आणि आतापर्यंत अशी गाड़ी चालवण्याची मज्जा कधीच आलेली नव्हती. आम्ही
डोंगराच्या पायथ्याशी पोहोचतच आलो होतो पण चिखल जास्त असल्याने तेथुन गाड़ी समोर जाने
अवघड होते. मामाने त्याच्या मित्राला कॉल केला त्याला बोलावून घेतले व तेथेच बाजूला
असलेल्या मामाच्या मित्राच्या शेतामध्ये आम्ही आमच्या गाड्या उभ्या केल्या आणि तेथुन
उरलेला १०० मिटर चा प्रवास पायी पायी केला. मी ,माझे तीन मित्र, मामा आणि मामाचा मित्र
अशे आम्ही ६ जणान्नी डोंगर चढ़ायला सुरुवात केली. डोंगराचा चढ़ एवढा खतरनाक की आमचा श्वास
फुलायला लागला. मामा आणि त्याचा मित्र सरसर डोंगर चढ़त होते, त्यांचा जोश बघून आमच्या
पण अंगावर शहारे फुटू लागले आणि आम्ही पण त्या चढ़ाई ला चांगले प्रतिउत्तर देऊ लागलो.
मोबाइल च्या कॅमेरा मध्ये कोणती आणि किती फोटो काढ़ायचे ते समजायना झाले जीकड़े बाघितले
तिकडे हिरवगार नजारा आणि ते क्षितिज, जणू ते पावसाचे ढग जमीनीलाच टेकलेले असावे. गप्पा
मारत मारत आम्ही एक डोंगर चढ़लो आता मज्जा होती ते लांब लांब चे दृश्य बघण्याची पण तेव्हड्यात
पावसाचा झोका आला आणि त्याने आम्हाला ओले करून टाकले. तिथे जणू ढग अंगाला स्पर्श करून चालले
होते. आम्ही आमच्या तयारीनुसार रेंकोट आणि छत्री सोबत नेलेली होतीच ते बॅग मधून काढले
आणि समोर निघालो. तेथे वर छोटे छोटे पाण्याचे झरे बघायला मिळाले. तुम्ही कदाचित पानी
फ़ाउंडेशन (Pani Foundation) बद्दल ऐकले असेल, अमीर खान च्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाद्वारे
ती मोहीम राबवण्यात आली होती त्यासाठी डोंगरांवर पावसाचे पानी जमा होण्यासाठी छोटे
छोटे खड्डे तयार केलेले होते तर त्या खड्ड्यांमधे पाणी साठलेल होत. त्या निर्मळ पावसाच्या
पाण्यासोबत आम्ही खूप वेळ खेळलो. ह्या गावाने त्या पाणी फ़ाउंडेशन च्या सत्यमेव जयते
वॉटर कप स्पर्धेत २०१८ किंवा २०१९ साली प्रथम क्रमांक पटकावला होता. गोळेगाव चे सरपंच मा. श्री. संतोष जोशी यांनी या गावाला एक वेगळीच कलाटणी देण्याचे काम केलेले आहे. गावामध्ये ग्रामस्वछता अभियान चालवले, गावामध्ये चांगले रस्ते बांधलेत थोडक्यात म्हंटले तर ह्या गावावर ते एवढे प्रेम करतात कि त्यांनी ह्या गावाला वेगळीच ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या व ह्या गावकऱ्यांचा अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले होते. तर ही एक ह्या गावाची यशोगाथा मी तुम्हाला
सांगितली. नंतर आम्ही पुढे निघालो चालत राहिलो... गप्पा, विनोद चालूच होते मामा आम्हाला
एक गाइड म्हणून आम्हाला मार्गदर्शन करत होता. पुढे आम्हाला एका मंदिरात जायचे होते
जे की पुढच्या डोंगरावर होते आम्ही आमची गती वाढवली आणि सरासरा पुढे निघालो अशा रीतिने
आम्हाला मंदिरात दर्शन वैगेरे घेइपर्यंत दुपारचे दोन वाजले, वापस फिरण्याची तयारी केली
वापस फिरलो कारण की आम्हाला ४ वजेच्या आत खाली यायचे होते आणि आम्ही वापस फिरलो जोरदार
भूक लागलेली होती मामी ने आमचासोबत डब्बे दिलेले होते त्यात भेंड़ीची भाजी, शेंगदाण्याची
चटनी, लोणच आणि १५ ते २० चपात्या दिल्या होत्या. एका ठिकाणी बसलो डब्बे खोलले, जेवलो
आणि काय ती जेवनाची मज्जाच वेगली होती, कोनतेच टेंशन नाही कोणती चिंता नाही, त्या निसर्गाच्या
कुशीत आम्ही रमुन गेलो होतो. जेवल्यानंतर मी त्या शांत आणि थंडगार वातावरनामध्ये मेडीटेशन
केले, १० मिनिटे एकाग्र झालो. सरासरी ३:३० वाजले होते, आम्ही निम्मे डोंगर उतरलों होतो
आणि ४ वाजेला आम्ही डोंगरच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथुन १०० मी परत चालावे लागले कारण
की मोटरसाइकल शेतामधे उभ्या होत्या. बूट पूर्ण चीखलाने भरलेले. आम्ही मोटरसाइकल वर
बसलो आणि पांधी च्या रस्त्याने वापस निघालो गावापाशी आलो मामाने गाड़ी थांबवली आणि आम्हाला
म्हणाला की ,मी तुमचे बूट वैगेरे धुण्याचा बंदोबस्त केला आहे, त्याने आम्हाला गावाच्या बाजूने जाणाऱ्या त्या ओढ्यापाशी नेल. अतिशय सुंदर आणि स्वछ पाणी वाहत होते. आम्ही चीखलाने भरलेले
बूट वैगेरे धूतले आणि अंघोळ सुद्धा केली. ते थंडगार वाहते पाणी, त्या ओढ़यातून बाहेर
यायचे मन होत नव्हते पण वेळ होत असल्यामुळे आम्ही तेथुन गावामध्ये असलेल्या मामाच्या
घरी गेलो, घरी जाताच बघतो काय तर माझ्या आज्जीने आणि मामी ने आमच्यासाठी स्वयंपाक तयार
करून ठेवला होता. खुप थकलेलो आम्ही जेवायला बसलो, अहो काय ती जेवनाची चव, तसे स्वादिष्ट
जेवण तुम्ही कधीही केले नसेल, कोणत्याच होटेल मध्ये तुम्हाला तशी जेवनाची चव मिळणार
नाही. पिण्यासाठी पाणी पाहिजे होते, तर मामाने आम्हाला गावाकडचे विहिरीचे पाणी सहन
होणार नाही म्हणून दुकान मधे जाऊन बिसलेरी चे प्युरिफाइड पानी आणले. त्या गावाला पाणीपुरवठा
एका विहिरिद्वारे होतो. एक विशेष म्हणजे त्या दिवशी मामाच्या मुलाचा वाढदिवस सुद्धा
होता पण गावाकडचे माणसांचे मन बघा त्याने त्या दिवशीही आमचा पाहुनचार करण्यात कोणतीही
कमी सोडली नाही. संध्याकालचे साडे पाच(५:३०) वाजले, मामा,मामी आणि आज्जीने आम्हाला
वाटी लावले मी आणि माझे मित्र औरंगाबाद साठी निघालो. गाडीवर गप्पा मारत मारत आम्ही
वापस येऊ लागलो त्यात माझ्या मित्रांनी काही उद्गार काढले की आपण सुद्धा गावाकड़े येऊन
राहिले पाहिजे. त्यात मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी डोळे भाराऊन टाकनारे उत्तर दिले, ते म्हणाले अरे ह्या शहरामधे कोणी चहा च सुद्धा विचारत नाही, आपले सखे पण आपल्याला
कधी येवढ प्रेम देत नाही जेवढ़ तुझ्या मामाने दिलय. आम्ही त्यांचासाठी अनोळखी आणि आमच्यासाठी
ते अनोळखी तरीही येवढा पाहुनचार, हृदय भारावून टाकनारा व मानुसकी ची जाण करून देणारा
तो दिवस होता. मी मीत्रांना सांगितले की आपण जाणार आहे त्याच्याकडे त्यामुळे त्याने
कामावरुण सुट्टी घेतली होती जेनेकरून तो आपल्याला फिरायला घेऊन जाऊ शकेल. हे सांगताच
माझ्या मीत्रांचे डोळे अशृंनी भरून आले. त्यांच्यासाठी तो क्षण अविस्मरनीय होता. शहरात
जन्म झाला असल्यामुळे त्यांना गावाकडचे वातावरण माहीत नव्हते. एकजुटीने राहने, येवढे
प्रेम त्यांनी कधी अनुभवले नव्हते. सगले क्षण आम्ही आमच्या कैमेरा मध्ये छायाचित्र
च्या रूपात टिपले होते. आम्ही आमच्या आमच्या घरी औरंगाबाद ला परतलो आणि आम्ही सुखरुप
पोहोचलो हे मामाला कळवण्यासाठी त्यास कॉल केला तेव्हा तो त्याच्या मूलाच्या वाढदिवसासाठी
केक आणायला गेलेला होता. दिवसभर येवढ़ा थकलेला तो आता त्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा
करण्याची तयारी करत होता. आम्ही घरी येऊन तर सुखाने झोपलो पण त्याला तो वाढदिवस साजरा
करून सगळे आवरुण मग झोपायचे होते. अशा रितीने आमचा हा प्रवास संपला. ह्या प्रवासामधून
आनंद तर खुप मिळाला पण खुप गोष्टी शिकायला मिळाल्या, मैत्री कशाला म्हणतात , प्रेम
काय असत, पाहुनचार कसा केला जातो, गवाकडचे ते शुद्ध वातावरण शरीरासाठी किती उपयुक्त
आहे ह्या सर्व गोष्टी शिकण्यासोबत अनुभवायला सुद्धा मिळाल्या. शहरात बघा मैत्री फक्त
व्हाट्सअप्प स्टेटस वर बघायला जास्त मिळते. मामाच्या मित्राने मैत्री चे एक उदाहरण
दाखवून दिले. तुम्ही जरका बॉयज नावाची मराठी
मूव्ही बाघितली असेल तर त्यात त्या धैर्या व धुंग्या ची जशी मैत्री दिसते तशीच माझ्या
मामाची आणि त्याच्या मित्राची. अशी होती ती गवाकड्ची माणसे व त्यांचे प्रेम. आम्ही
त्या निसर्गाचा खूप आस्वाद घेतला आणि खूप मजा केली. मी ह्या लेखातुन तुम्हाला माझा
एक छोटासा अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की कळवा...
धन्यवाद !
मी आणि माझे सहकारी ,
१) मयुर वरपे (मी )
२) नवनाथ पोफळे (माझा मामा )
३) बाबासाहेब फुलारे (मामाचा मित्र )
४) वरद लाड (माझा मित्र )
५) सागर यादव (माझा मित्र )
६) ओंकार लाड (माझा मित्र)
Your words feels like a magic ❤️
ReplyDeleteThank you :)
Deleteit is really awesome, it seems like i am actually there and experiencing all that things over there ..... explained very well.
ReplyDeleteEnjoyable writing... ❤️
Keep it up 🔥🤩
Thank you :)
DeleteVery nice words...😍
ReplyDeleteI felt like I’m there.
I really want to read more stories of you🔥
Aree bhai, thank you :)
DeleteI want to make the same plan again with you
ReplyDeleteHope soon💥
Yes of course, we will :) please can you tell me your name
Delete👏🏻👏🏻🔥🔥
ReplyDeleteThank you:)
DeleteThough I was not there at that time with u guys, still the way that u explained and narrated ur trip is just awesome n enjoyable💜Very good writing that just by reading everything was give the feel that I'm with u guys n everything was clearly visualized.Great story....keep it up🤗🙏💞👑
ReplyDeleteAwesome bro .....u create it in fabulous way nice writing keep it up.....👏👏👏👌👌👌👌
ReplyDeleteThank you:)
DeleteFeeling awesome 🔥🔥खुप च छान शब्दात मांडले आहे 😍😍..
ReplyDeleteThank You so much
Delete